अभिनेत्री कियारा अडवाणी नेहमी तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडलेली असते. कियारा तिच्या इंस्टाग्राम @kiaraaliaadvani हॅण्डलवरून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे अनेक फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशामध्ये तिचा नवा फोटोशूट व्हायरल होत आहे. चाहत्यांनी याला उत्तम प्रतिसाद दिला आहे.
कियारा म्हणजे सौंदर्याचा दर्या... सौंदर्याची जणू व्याख्याच! (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री कियारा अडवाणीने तिच्या @kiaraaliaadvani या सोशल मीडिया हॅन्डलवर नवीन फोटोशूट शेअर केला आहे. या फोटोशूटमध्ये अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे.
'उडते केस, डोळ्यात तेज आणि कानात नक्षीदार सुवर्ण झुमके' तिच्या सौंदर्याला आणखीन फुलवत आहे. सौंदर्य काय असते? कियारा याची व्याख्याच जणू!
पोस्टखाली कॅप्शनमध्ये कियाराने या फोटोशूटबद्दल सर्व माहिती नमूद केली आहे. कॅप्शनमध्ये माहिती देण्याअगोदर तिने केवळ एक हृदयाचे ईमोजी ठेवले आहे.
पोस्टखाली कॉमेंट्समध्ये सौंदर्याची जादू झाली आहे. नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिच्या सौंदर्याला उत्तम प्रतिसाद चाहत्यांनी दिला आहे.
सफेद रंगातील या आउटफिटमध्ये अभिनेत्री फार गोंडस दिसत आहे. खरंच, तिच्या या निखळ सौंदर्याला तोडच नाही.