Kidney Detox: किडनी शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर काढून टाकते. रक्तामधील विषारी घटक गाळून शरीरातील फ्लूइडचे संतुलन ठेवण्याचे महत्वपूर्ण काम किडनी करते. पण जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांमुळे आणि कामाच्या वाढत्या तणावामुळे शरीराकडे लक्ष देण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. किडनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे किडनीचे संतुलन बिघडून जाते. किडनीच्या कार्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी तसेच साचून राहतात. त्यामुळे किडनी डिटॉक्स करण्यासाठी आहारात या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – istock)
किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा हे हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ

क्रॅनबेरीमध्ये प्रोअँथोसायनिडिन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे मूत्रमार्गाच्या आतील भागाला चिकटणाऱ्या बॅक्टेरियांचे प्रमाण कमी होते. याशिवाय युरीन इन्फेक्शनचा धोका कमी होऊन किडनीवर कोणताही परिणाम होत नाही.

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी एक ग्लास लिंबू पाणी प्यावे. लिंबू पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यासोबतच किडनीमधील विषारी घटक बाहेर पडून जातात. तसेच लिंबामध्ये असलेले सायट्रेट ऍसिड किडनी स्टोन तयार करत नाही.

बीटरूटमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि बीटाइन इत्यादी वनस्पतीजन्य घटक असतात. शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बीटचा रस प्यावा.

रोजच्या आहारात नियमित एक सफरचंद खावे. सफरचंद खाल्ल्यामुळे गंभीर आजारांचा धोका कमी होतो. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी घटक आरोग्य चांगले ठेवतात.

लसूणमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी घटक असतात. उपाशी पोटी नियमित एक तुपात भाजलेली लसूण चावून खाल्ल्यास रक्तात वाढलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होते.






