divya pugaonkar haldi ceremony photos
'लक्ष्मी निवास' फेम दिव्या पुगांवकर हिच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. रियल लाईफमध्येही आणि रिल लाईफमध्येही तिच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. केळवण, साखरपुडा, संगीत आणि आता हळदी कार्यक्रमामुळे अभिनेत्री चर्चेत आहे.
दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय घरत असं असून ते दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांचा तिलक समारंभ २०२१ मध्ये पार पडला होता. यानंतर अभिनेत्री लग्नबंधनात केव्हा अडकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर सर्वांची प्रतीक्षा आता संपली. अक्षय घरत हा फिटनेस मॉडेल असून न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे.
सोशल मीडियावर दिव्या आणि अक्षयच्या साखरपुडा आणि संगीतातले अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याच दरम्यान, त्यांचे आता हळदी समारंभातले फोटो व्हायरल होत आहेत. दिव्याला अक्षयची उष्टी हळद लागली असून हळदी समारंभातल्या दोघांच्याही लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
साधा सिंपल लूक, हळदीच्या कपड्यांवर फुलांचे दागिने आणि त्यावर हिरवा चुडा असा अभिनेत्रीचा लूक पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीच्या साध्या सिंपल लूकने सर्वांचेच लक्ष वेधले. दिव्या सोशल मिडियावर सक्रिय असून तिच्या लग्नसमारंभातील खास क्षण आणि फोटोज सोशल मिडियावर आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट करत आहे.
हळदीमध्ये दिव्याने पिवळ्या रंगाचं स्कर्ट आणि स्क्वेअर नेकलाइन विथ पफ स्लीव्ह असलेला ब्लाऊज परिधान केला होता. त्यावर मोगऱ्याच्या फुलांपासून बनवलेल्या ज्वेलरीचा साज चढवला होता. यात तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, तिच्या होणाऱ्या पतीचे हळदीचे फोटोसमोर आले नाहीत. दिव्याचे हे हळदीतले फोटो अल्पावधीतच व्हायरल झाले आहेत.