Lalbaugcha Raja 2025 : उत्साहात पार पडला लालबागच्या राजाचा “गणेश मुहूर्त”; मंत्रमुग्ध करणारे Photos आले समोर
'नवसाला पावणारा बाप्पा' या नावानेही लालबागचा राजाला ओळखले जाते. त्याच्या दर्शनासाठी दूरदूरवरून लोक मुंबईत येतात आणि बाप्पाचे दर्शन घेतात
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ९२ वे वर्ष आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही लालबागच्या राजाचा “गणेश मुहूर्त” सोहळा शनिवार दिनांक १४ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या शुभ हस्ते सकाळी ठीक ६ वाजता लालबागच्या राजाचे मूर्तिकार कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेत हा सोहळा संपन्न झाला
सदर प्रसंगी मंडळाचे खजिनदार श्री मंगेश दत्ताराम दळवी यांच्या शुभहस्ते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकांचेही पूजन झाले
यावर्षी लालबागचा राजाचा गणेशोत्सव सोहळा गणेशचतुर्थी, बुधवार दिनांक २७ ऑगस्ट २०२५ ते अनंतचतुर्दशी,शनिवार दिनांक ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत साजरा होणार आहे.