'लक्ष्मीनिवास' मालिकेत आरती दळवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पायल पांडे लवकरच आई होणार आहे. नुकताच तिचा डोहाळे जेवणाचा समारंभ पार पडला असून, या खास क्षणांचे फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
फोटो सौजन्य - Social Media

मालिकेत पायल पांडेने भावना गाडे-पाटील यांच्या मोठ्या भावाची पत्नी आरती दळवी हे पात्र साकारले आहे.

अभिनेत्रीने तिच्या @payaliyaaa_ या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर डोहाळे जेवणाचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

या सोहळ्यासाठी पायलने हिरव्या रंगाची पारंपरिक साडी परिधान करत मराठमोळा लूक केला होता. नाकातील नथ, फुलांचे दागिने आणि आकर्षक अलंकारांमुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते. या खास प्रसंगासाठी तिने केलेले फोटोशूट चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरले आहे.

पायलच्या हातावरील मेहंदीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मेहंदीच्या डिझाइनमधून मातृत्वाचे सुंदर चित्रण करण्यात आले असून, त्यामध्ये 'आई-बाबा' असा उल्लेखही करण्यात आला आहे. तसेच तिच्या मंगळसूत्रावरील 'आहो' नावाच्या खास पेंडंटचीही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

हे फोटो शेअर करत अभिनेत्रीने, "मातृत्वाच्या कोमल क्षणात गुंफलेला आनंद," असे भावनिक कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव करत आगामी मातृत्व प्रवासासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.






