निसर्गात जन्माला आलेला प्रत्येक सजीवाची काहींना काही भूमिका असते. आपली कर्तव्य पार पाडल्यानंतर जीव लगेच आपला जीवन संपवून टाकतात. पण त्यात असलेले असे काही सजीव ज्यांचे आयुष्य सुरु होण्याआधीच संपून जाते. हे प्राणी काही मिनिटांच्या आधीच संपवून टाकतात. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत हे सजीव, याबद्दल सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)
असे सजीव ज्यांच्याकडे जगण्यासाठी असतो फार कमी वेळ, जाणून घेऊया प्राण्यांबद्दल सविस्तर माहिती

मेफ्लाईचा सकाळी जन्म, सायंकाळी मृत्यू होतो. या जिवाने शॉर्ट लाईफचा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे. वय झाल्यानंतर मेफ्लाई याच्या जवळ २४ तासांचे किंवा त्याहूनही अधिक कमी वेळ असतो.

गॅस्ट्रोट्रिच हा पाण्यात राहणारा जीव आहे. आकाराने अतिशय लहान असलेला जीव डोळ्यांनासुद्धा व्यवस्थित दिसून येत नाही. या जीवाचे आयुष्य ३ किंवा ४ दिवसांमध्येच संपून जाते.

लूना मॉथ हा पतंगासारखा दिसणारा अतिशय सुंदर जीव आहे. या जीवाचे आयुष्य फक्त ७ दिवसांचे असते. हा जीव वयस्कर झाल्यानंतर कोणत्याही गोष्टींचे सेवन करत नाही.

नर जातीच्या मुंग्या जास्त वेळ जिवंत राहत नाही. नर मुंगेचे एक वैशिष्ट्य म्हणजे राणी मुंगी सोबत प्रजनन करणे. हे काम झाल्यानंतर नर मुंगी काही आठवड्यांमध्येच मरण पावते.

मच्छर हा आजार पसरवणारा जीव आहे. मच्छरचे आयुष्य फार कमी असते, पण आरोग्यासंबंधित अतिशय गंभीर समस्या निर्माण करते. नर मच्छर किंवा डास जास्तीत जास्त एक आठवडाभर जिवंत राहतात.






