भाऊबीजच्या दिवशी लाडक्या भावासाठी बनवा 'हे' चविष्ट गोड पदार्थ
भाऊबीजच्या दिवशी तुम्ही लाडक्या भावासाठी श्रीखंड पुरी बनवू शकता. श्रीखंड बनवण्यासाठी कमीत कमी साहित्य लागते. तुम्ही घरी केशर श्रीखंड किंवा वेलची श्रीखंड बनवू शकता.
साखरेच्या पाकात बनवले जाणारे गुलाबजाम लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतात. पाकातले गुलाबजाम आधल्या दिवशीच बनवून ठेवावे.
झटपट तयार होणारा पदार्थ म्हणजे बासुंदी.बासुंदी तुम्ही सीताफळ किंवा काजू बदामाचा वापर करून बनवू शकता.
रसमलाई घरातील सगळ्यांचं खूप आवडते. रसमलाई बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे भाऊबीजेच्या आधल्या दिवशीची रसमलाई बनवून ठेवू शकता.
खिरीमध्ये तुम्ही शेवयांची खीर, मखाणा खीर किंवा तांदळाची चविष्ट खीर बनवू शकता. खीर हा पदार्थ सणाच्या दिवशी सर्वच घरांमध्ये बनवला जातो.