सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत Potato Bites
सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर प्रत्येकालाच नाश्ता करण्याची सवय असते. नाश्ता केल्यामुळे आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाल्ला जातो. मात्र कायमच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. नेहमीच पोटभर नाश्ता करावा. कारण नाश्ता केल्यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चमचमीत आणि टेस्टी पोटॅटो बाइट्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बऱ्याचदा लहान मुलांना शाळेच्या डब्यात किंवा बाहेर फिरायला जाताना काहींना काही टेस्टी पदार्थ हवा असतो, अशावेळी तुम्ही पोटॅटो बाइट्स बनवू शकता. लहान मुलांना बटाट्यापासून बनवलेले पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. चला तर जाणून घेऊया पोटॅटो बाइट्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत बटाटा वाटाणा भाजी, नोट करा रेसिपी
१० मिनिटांमध्ये घरी सोप्या पद्धतीत बनवा कुरकुरीत लसूण चटणी, महिनाभर व्यवस्थित टिकून राहील पदार्थ