फरसबीची भाजी आवडत नसेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटकदार चटणी
लहान मुलांसह मोठे सुद्धा कायमच भाज्या खाण्यास नकार देतात. हिरव्या पालेभाज्या किंवा इतर फळ भाज्या पाहिल्यानंतर मुलं नाक मुरडतात, पण आहारात भाज्यांचा समावेश करणे गरजेचे आहे. दैनंदिन आहारात गाजर, पालक, बीट, भोपळा, मेथी, कारलं इत्यादी भाज्यांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. पुलाव किंवा मिक्स भाजी बनवताना फरसबीच्या भाजीचा वापर केला जातो. ही भाजी चवीला अतिशय पांचट लागते, असे अनेकांना वाटत. पण फरसबी खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे.फरसबीमध्ये फायबर, जीवनसत्त्व आणि खनिजे इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याआधी तुम्ही शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी किंवा लसूण चटणी खाल्ली असेल. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये फरसबीची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कमीत कमी साहित्यामध्ये अगदी घाईच्या वेळी तुम्ही फारसबीची चटणी बनवू शकता. फरसबीची चटणी गरमागरम भाकरी आणि चटणीसोबत अतिशय सुंदर लागते. जाणून घ्या फरसबीची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
तेच तेच बोरिंग पदार्थ खाणं सोडा, नवरात्रीच्या उपवासात घरी बनवा साबुदाण्याची लुसलुशीत पुरी
दसऱ्यानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा चवदार सफरचंदाची खीर, नोट करून घ्या रेसिपी