पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पालकपासून बनवा 'हे' चविष्ट चमचमीत पदार्थ
पालकपासून घरात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे तुम्ही घरात पालक पनीर बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पालक पनीर खायला खूप जास्त आवडते. पालक पनीर तुम्ही पराठा किंवा चपातीसोबत खाऊ शकता.
नेहमीच आलू पराठा, कोबी पराठा खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही पालक पराठा बनवू शकता. पालकची भाजी खायला लहान मुलांना आवडत नाही. त्यामुळे तुम्ही मुलांसाठी असे काही पदार्थ बनवू शकता.
नेहमीच साधं वरण खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही पालक डाळ बनवू शकता. पालकचे वरण बनवून त्यावर तुम्ही लसूणची खमंग फोडणी देऊ शकता.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कांदाभजी, बटाटा भजी आणि इतर वेगवेगळ्या भाज्यांपासून भजी बनवली जाते. त्यामुळे संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी तुम्ही पालक भजी बनवू शकता.
लहान मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी तुम्ही पालक पुरी बनवू शकता. हिरव्या रंगाची पुरी पाहून लहान मुलं सुद्धा खूप जास्त खुश होतील. पालक पुदी तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता.