तणावमुक्त जीवनासाठी नियमित १० मिनिटं करा ध्यान
शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर ध्यान, प्राणायाम, योगासने करावीत. यामुळे मनावर नियंत्रण मिळवता येते.तसेच तणाव कमी होऊन मन आनंदी आणि प्रसन्न राहते.
दिवसभर सतत काम करत राहिल्यामुळे शरीरात तणाव वाढतो. या तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी नियमित थोडावेळ काढत ध्यान करावे. यामुळे रात्रीच्या वेळी शांत झोप लागते आणि डोक्यातील विचार शांत होण्यासाठी मदत होते.
ध्यान केल्यामुळे शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात. महिलांमध्ये हार्मोन्स असंतुलित झाल्यानंतर सतत मूड बदलणे, तणाव वाढणे इत्यादी समस्या दिसून येतात. हाच तणाव कमी करण्यासाठी ध्यान करावे.
भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मनातील भावना कमी होतात आणि डोकं शांत राहतं. डोक्यात सतत येणारे नकारात्मक विचार कमी होतात.
मानसिक तणाव वाढल्यानंतर झोपेची गुणवत्ता खराब होऊन जाते. झोप पूर्ण न झाल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. ध्यान केल्यामुळे रात्रीच्या वेळी शांत झोप लागते.