मराठी लहान पडद्यावर गाजलेली अभिनेत्री एतशा संझगिरी सध्या शूटिंगपासून वेळ काढून तिच्या लग्नकार्यामध्ये व्यस्थ आहे. एतशाचा आज मेहंदीचा कार्यक्रम तिच्या राहत्या घरी पार पडला आहे. त्या सोहळ्याचे काही क्षण तिने शेअर केले आहेत. अभिनेत्री सावल्याची जणू सावली मालिकेतील देवा हे पात्र साकारणारा सुप्रसिद्ध अभिनेता निषाद भोईरसह साता जन्माची गाठ बांधत आहे.
एतशा संझगिरीच्या हातावर रंगली मेहंदी! (फोटो सौजन्य - Social Media)

सध्या तिचा मेहंदीचा कार्यक्रम रंगला आहे. या कार्यक्रमात तिच्या कुटुंबातील मंडळी उपस्थित आहेत. घरी जल्लोषाचे वातावरण आहे.

एतशाने मेहंदीमध्ये पिंक लुक केला होता. तिने गुलाबी आऊटफिट परिधान केले होते. तसेच तिचे सौंदर्य तिच्या सुंदरतेचे वर्णन करत होते.

एतशा आणि निषाद लवकरच लग्नबंधनात अडकणार असून आज एतशाचा मेहंदी सोहळा रंगला आहे. लवकरच दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत.

एतशाने 'पुण्यश्लोक अहिल्याबाई', 'छोटी मालकीण' या मालिकांमध्ये काम केले आहे.

निषाद भोईर हा एक भारतीय अभिनेता आणि नाट्य कलाकार आहे जो अपराधी सुगंधा या नाटकातील त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो.






