कर्जत, रायगडमध्ये कोंढाणे धरणाच्या जमिनीच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर आदिवासी आणि जनतेची फसवणूक केल्याचा आरोप केला. कोंढाणे धरणासाठी लागणाऱ्या जमिनीवरून बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून जमीन लाटण्याचा प्रयत्न झाल्याचा दावाही त्यांनी केला. थोरवेंच्या कथित जुन्या कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी करत “माझीही ED चौकशी करा” असे आव्हान घारेंनी दिले. तसेच शिवसैनिकांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी थोरवेंवर टीका केली.