Five New Motorcycles Heading to India in 2027 (फोटो सौजन्य-AI एआय)
EICMA 2026 (EICMA 2026 India-Bound Bikes) या इटलीतील मिलान येथे पार पडलेल्या मोटरसायकल प्रदर्शनात अनेक नवीन बाइक्स सादर करण्यात आल्या आहेत. रॉयल एनफिल्ड, हिरो मोटोकॉर्प, नॉर्टन आणि हार्ले-डेव्हिडसन या कंपन्यांनी भारतीय मार्केटसाठी खास मोटरसायकल्स दाखवल्या आहेत. यामध्ये रॉयल एनफिल्ड हिमालयन 750, कॉन्टिनेंटल GT 750, हिरो XPulse 450, नॉर्टन 450 अर्बन रोडस्टर आणि हार्ले-डेव्हिडसन X350T यांचा समावेश आहे. या बाइक्स 2027 मध्ये भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.
रॉयल एनफिल्ड हिमालयन 750
रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 चे जागतिक सादरीकरण EICMA 2026 मध्ये झाले. या अॅडव्हेंचर टूररमध्ये 743cc एअर/ऑइल-कूल्ड पॅरलल-ट्विन इंजिन आहे. हे इंजिन 55 bhp पॉवर आणि 63 Nm टॉर्क जनरेट करते. 7-इंच LED हेडलॅम्प, 4-इंच TFT डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, राइडिंग मोड्स आणि TPMS यांसारखी फीचर्स मिळतात.
टोयोटा Land Cruiser FJ Diesel Engine लवकरच येणार? भारतात 2028 मध्ये लाँच होण्याची शक्यता
नॉर्टन 450 अर्बन रोडस्टर
नॉर्टन 450 अर्बन रोडस्टरमध्ये 454cc लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 46.4 bhp पॉवर आणि 45 Nm टॉर्क देते. 6-स्पीड गिअरबॉक्ससह क्विकशिफ्टर, 8-इंच TFT टचस्क्रीन, ट्रॅक्शन कंट्रोल, हीटेड ग्रिप्स आणि क्रूझ कंट्रोल मिळणार आहेत. भारतात या बाईकचे प्रोडक्शन टीव्हीएस मोटर कंपनीच्या होसूर प्लांटमध्ये होणार आहे.
रॉयल एनफिल्ड कॉन्टिनेंटल GT 750
कॅफे रेसर स्टाइलमध्ये सादर झालेल्या कॉन्टिनेंटल GT 750 मध्ये हिमालयन 750 चे 743cc इंजिन वापरण्यात आले आहे. 55 bhp पॉवर आणि 63 Nm टॉर्कसह 6-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. ही बाईक फेयर्ड आणि अनफेयर्ड डिझाइनमध्ये येऊ शकते.
हिरो XPulse 450
हिरो XPulse 450 मध्ये 421cc लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. 46 bhp पॉवर आणि 38 Nm टॉर्क जनरेट करणाऱ्या या इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटी हे या बाईकचे खास फीचर आहे.
हार्ले-डेव्हिडसन X350T
हार्ले-डेव्हिडसन X350T मध्ये 350cc एअर-ऑइल कूल्ड इंजिन मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक थ्रॉटल, राइडिंग मोड्स, स्विचेबल ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोल यांचा समावेश आहे. भारतासाठी विकसित करण्यात आलेल्या या बाईकची किंमत आणि डिलिव्हरीची माहिती लवकरच समोर येण्याची अपेक्षा आहे.
Ans: रॉयल एनफिल्ड हिमालयन 750, नॉर्टन 450 अर्बन रोडस्टर, रॉयल एनफिल्ड कॉन्टिनेंटल GT 750, हिरो XPulse 450 आणि हार्ले-डेव्हिडसन X350T या 5 बाइक्स सादर झाल्या आहेत.
Ans: रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 मध्ये 743cc एअर/ऑइल-कूल्ड पॅरलल-ट्विन इंजिन मिळते. हे इंजिन 55 bhp पॉवर आणि 63 Nm टॉर्क जनरेट करते.
Ans: हार्ले-डेव्हिडसन X350T भारतात लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. तिची किंमत आणि डिलिव्हरीसंबंधी माहिती कंपनीकडून जाहीर होणे अपेक्षित आहे.






