diabetes च्या रुग्णांसाठी मोरिंगाच्या बिया ठरतील वरदान!
मोरिंगा बियांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे शरीर अनेक गंभीर रोगांपासून निरोगी राहते.
मोरिंगाच्या बियांमध्ये विटामिन सी, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येते. या बियांच्या सेवनामुळे सर्दी, संसर्ग आणि इतर आजारांपासून शरीराचा बचाव होतो.
शरीरात वाढलेला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मोरिंगाच्या बियांचे नियमित सेवन करावे. या बिया रक्तातील साखर वाढू देत नाहीत. याशिवाय इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते.
मोरिंगाच्या बिया त्वचा आणि केसांसाठी अतिशय गुणकारी आहेत. या बियांमध्ये असलेले घटक त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. तसेच या बियांच्या पावडरचे सेवन तुम्ही कोमट पाण्यातून करू शकता.
सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी मोरिंगाच्या बियांचे सेवन करावे. यामुळे हाडांसंबंधित समस्या दूर होतात. मोरिंगाच्या बियांची मालिश सांध्यांना केल्यास लगेच आराम मिळेल.