संग्रहित फोटो
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश ऑर्ड (रा. शिरजगाव अर्डक, ता. चांदूरबाजार) यांनी काही वर्षांपूर्वी माऊलीनगर परिसरात घर बांधले आहे. त्यांचे सासरे नाना पुंडलिकराव कराळे (वय ६५) हे गेल्या दोन महिन्यांपासून मुलगी आणि जावयासोबत येथे राहत आहेत. घटनेच्या रात्री मंगेश ऑर्ड आणि त्यांची पत्नी जेवण आटोपून आपल्या गावी गेले होते. त्यामुळे घरात नाना कराळे आणि त्यांची पत्नी असे वृद्ध दाम्पत्यच होते. याच संधीचा फायदा घेत दोन लुटारूंनी घराच्या हॉलची ग्रील तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर वृद्ध दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने लुटले. यामध्ये ३० ग्रॅम वजनाचे दोन मंगळसूत्र, २० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या पट्ट्या, २० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या आणि पाच हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज होता.
लुटारूंच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना
लुटलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत सुमारे ३ लाख ३५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी तक्रारीवरून चांदूरबाजार पोलिसांनी अज्ञात लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार आधारसिंह सोनवणे आणि एपीआय प्रेम केदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. लुटारूंचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच घटनास्थळी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी गरुड यांनीही घटनास्थळाची पाहणी केली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Ans: अमरावती मार्गावरील माऊलीनगर परिसरात ही घटना घडली.
Ans: दोन लुटारूंनी वृद्ध दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून ३ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ५ हजार रुपये रोख लुटले.
Ans: चांदूरबाजार पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन पथके रवाना केली. तसेच श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.






