भारतीय संघात तीन मोठे बदल (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
पहिल्या तीन सामन्यात कर्णधारपद भूषविणारा शुभमन गिल आता संघातून बाहेर आला असून श्रेयस अय्यर चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी कॅप्टन्सी करणार आहे. श्रेयस टी२० साठी भारतीय संघाचा कर्णधार असून एकदिवसीय सामन्यासाठी पहिल्यांदाच कर्णधारपद स्वीकारत आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारत सध्या २-० आघाडीवर आहे आणि न्यूझीलंडविरुद्ध सिरीजवर कब्जा मिळविण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने भारताला आपल्या खिशात घालायचे आहेत.
IND Vs NZ: न्यूझीलंडच्या विजयाच्या शक्यतेवर पावसाने फिरवले पाणी; तिसरा वनडे सामना रद्द, आता…
बीसीसीआयने १९ नोव्हेंबरपासून वेलिंग्टनमध्ये सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. कर्णधार शुभमन गिल, अनुभवी यष्टीरक्षक केएल राहुल आणि वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज यांना एकदिवसीय संघातून मुक्त करण्यात आले आहे. हे तिन्ही खेळाडू आता कसोटी मालिकेच्या तयारीसाठी वेलिंग्टनला रवाना होतील. दरम्यान, एकदिवसीय संघात तीन युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
टी-२० उपकर्णधार तिलक वर्माने एकदिवसीय संघात पुनरागमन केले आहे. तो शेवटचा एकदिवसीय सामना डिसेंबर २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. तर या दोन्ही सामन्यांसाठी यश ठाकूर आणि कुमार कुशाग्र या दोन युवा खेळाडूंनी भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केले आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, ईशान किशन, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांसारखे अनुभवी खेळाडू संघात कायम राहतील.
IND Vs NZ: गिलची सेना किवींना ‘किल’ करण्यासाठी सज्ज! सिरीज जिंकण्याची संधी तर, Playing 11 मध्ये…
भारताचा अपडेटेड एकदिवसीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, ईशान किशन (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, यश ठाकूर, कुलदीप यादव
चौथ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताचा संघः ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, नमन धीर, अक्षर पटेल, आकिब नबी, अर्शदीप सिंह, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, यश ठाकूर
Ans: 13 आणि15 नोव्हेंबर रोजी भारत आणि न्यूझीलंड उर्वरित दोन सामने
Ans: श्रेयस अय्यर भारतासाठी कर्णधार म्हणून खेळणार आहे
Ans: शुभमन गिल कसोटी सामन्यांसाठी रवाना झाल्यामुळे उर्वरित दोन सामने खेळणार नाही






