शारदीय नवरात्री उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. देवीची मनोभावे पूजा करून नैवेद्य अर्पण केला जातो. तर अनेक ठिकाणी गरबा आणि दांडियांचे आयोजन केले जाते. गरबा खेळायला जाताना सुंदर सुंदर लेहेंगा परिधान करून त्यावर ऑक्सिडाईज कानातले घातले जातात. यामुळे साधा कुर्ता सुद्धा अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतो. चला तर पाहुयात ऑक्सिडाईज कानातल्यांच्या सुंदर डिझाईन. (फोटो सौजन्य – pinterest)
नवरात्रीत लुक दिसेल हटके! पहा पारंपरिक आणि मॉडर्न ऑक्सिडाईज कानातल्यांच्या सुंदर डिझाइन्स

नवरात्रीमध्ये ऑक्सिडाईज दागिन्यांना खूप जास्त मागणी असते.ऑक्सिडाईज कानातले, नेकलेस, कंबरपट्टा, अंगठी इत्यादी दागिने लेहेंगा परिधान केल्यानंतर त्यावर घातले जातात.

गरबा खेळायला जाताना साधी कुर्ती घालून त्यावर ऑक्सिडाईज झुमके किंवा या डिझाईनचे मोठे कानातले घातल्यास लुक अतिशय उठावदार दिसेल आणि कान सुद्धा भरगच्च वाटतील.

नवरात्रीच्या दिवसांत रंगीबेरंगी कुर्ता, घागरा किंवा साडी नेसली जाते. त्यावर ऑक्सिडाईज दागिने घातल्यास पारंपरिक पोशाख सुद्धा आणखीनच खुलून दिसतो.

ऑक्सिडाईज कानातले केवळ पारंपरिक कपड्यांवरच नाहीतर इंडो-वेस्टर्न कपड्यांवरही सुंदर दिसतात. केवळ कानातलेच नाहीतर बाजारात ऑक्सिडाईज एअरकफसुद्धा उपलब्ध आहेत.

मोठ्या आकाराचा ऑक्सिडाईज कानातले कोणत्याही साध्या ड्रेस किंवा कुर्तीसोबत अतिशय सुंदर दिसतात. बाजारात अगदी ५० रुपयांपासून ते अगदी ५०० रुपयांपर्यंत ऑक्सिडाईज कानातले विकत मिळतात.






