काही महिन्यांपूर्वी कॅन्सरमुळे मृत्यू झालाय असा स्टंट करणारी आणि नेहमीच चर्चेत राहणारी पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते तिच्या नव्या फोटोशूटमुळे. पूनम पांडेने आता हाफन्यूड फोटोशूट करत पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आपल्या परफेक्ट फिगर आणि क्लासी परफेक्ट फॅशनमुळे तसंच वेगवेगळ्या विधानांमुळे पूनम आपल्या चाहत्यांना नेहमीच मालमसाला देत असते. आता पुन्हा एकदा या नव्या बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटीफूल लुकने तिने सर्वांनाच घायाळ केलंय. (फोटो सौजन्य - Instagram)
पूनम पांडेचे सोशल मीडिया हे नेहमीच फोटोंनी भरभरून वाहत असते. तिचा कोणताही लुक हा व्हायरल होताना दिसतो. आता नुकतेच तिने हाफन्यूड फोटोशूट करून पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलंय
पूनम पांडेने Animal Print बिकिनी घातली असून त्यावर ट्रान्सपरंट ब्राऊन टॉप परिधान केलाय आणि वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. तर नेहमीप्रमाणे तिच्या या अदांनी चाहत्यांचा हृदयावर वार होताना दिसून येत आहेत
या क्लासी आणि सॅसी बिकिनी लुकसह तिने केसांना कर्ल लुक दिला असून केस मोकळे सोडले आहेत आणि स्टाईल केली आहे. तिच्या मोठ्या केसांना हा लुक अत्यंत आकर्षक आणि उठावदार दिसतोय
या बिकिनी लुकसह पूनमने गोल्डन कानातले आणि अंगठ्यादेखील घातल्या आहेत आणि तिची ही स्टाईल कोणत्याही बिकनी लुकसाठी परफेक्ट मानली जाऊ शकते. एखाद्या बीच वेकेशनसाठीही तुम्ही या लुकवरून प्रेरणा घेऊ शकता
पूनमच्या या फोटोंमध्ये हॉटनेस ओव्हरलोड झाल्याचे अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे. तर साधा पण तरीही ग्लॅमरस आणि आकर्षक असा लुक पूनमने यावेळी करत आपल्या अदांनी सर्वांना घायाळ केलंय
या बिकनी लुकसह पूनम पांडेने ग्लॉसी आणि ग्लॅमरस असा मेकअप केलाय. फाऊंडेशन, डार्क आयब्रो, आयलायनर, आयलीड, ब्राऊन आयशॅडो आणि त्यासह ओठांना न्यूड लिपस्टिक लावत तिने लुक पूर्ण केलाय