त्वचा निरोगी आणि डागविरहित ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश केला जातो. भाज्यांच्या सेवनामुळे त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होते आणि डाग कमी होतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, काळे डाग आणि मुरूम घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारातील महागडे फेसपॅक, फेसमास्क लावले जातात तर कधी महागड्या स्किन ट्रीटमेंट सुद्धा करून घेतल्या जातात. पण यामुळे फारसा बदल त्वचेमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे या भाज्यांचा वापर करून बनवलेला फेसपॅक त्वचेवर लावल्यास चेहरा उजळदार होण्यास मदत होईल आणि पिंपल्स कमी होतील. (फोटो सौजन्य – istock)
टॅनिंग- डलनेस होईल कायमचा दूर! 'या' भाज्यांचा वापर करून घरीच तयार करा फेसपॅक, त्वचेवर येईल पार्लरसारखा ग्लो

वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे त्वचा कायमच निस्तेज होऊन जाते. चेहऱ्यावर जमा झालेली धूळ, माती आणि डेड स्किन स्वच्छ करण्यासाठी भाज्यांचे फेसपॅक प्रभावी ठरतील.

वर्षाच्या बाराही महिने बाजारात काकडी उपलब्ध असते. काकडीच्या वापरामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात. चेहऱ्यावर वाढलेली जळजळ आणि त्वचा शांत ठेवण्यासाठी काकडीचा रस चेहऱ्यावर लावावा.

बीटमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेवर नॅचरल गुलाबी चमक आणतात. तसेच बाजारात बीट पावडर सहज उपलब्ध होते. तांदळाचे पीठ घेऊन त्यात बीटचा रस मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावून काहीवेळा ठेवा आणि त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका.

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी टोमॅटो फेसपॅक खूप गुणकारी ठरतो. टोमॅटोच्या रसात कॉफी पावडर मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. मसाज केल्यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल.

डोळ्यांभोवती वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी आणि त्वचा स्वच्छ करण्यासाठी बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावून ठेवा. यामुळे त्वचा उजळदार होते आणि त्वचेच्या समस्या कमी होतात.






