प्रोटीनयुक्त पदार्थांचे आहारात करा सेवन
मूग डाळ, उडीद डाळ, चना डाळ आणि मसूर डाळ इत्यादी कडधान्यांमध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणावर आढळून येते. या सर्व कडधान्यांमध्ये अमीनो ऍसिड आढळून येते. मिश्र डाळींपासून तुम्ही सूप, भाजी,सलॅड इत्यादी पदार्थ बनवू शकता.
पालक, ब्रोकोली, मशरूम इत्यादी सर्वच भाज्यांमध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे दैनंदिन जीवनात तुम्ही आहारामध्ये सर्व भाज्यांचा समावेश करू शकता. या भाज्या शरीरासाठी आरोग्यदायी ठरतील.
कमी झालेली प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी रोज सकाळी उठल्यानंतर कडधान्यापासून बनवलेलं सॅलड खावे. सलॅड खाल्ल्याने आरोग्यालाअनेक फायदे होतात.
काळे हरभरे, राजमा आणि चणे, शेंगदाणे इत्यादी पदार्थांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुम्ही बीन्सचा वापर सॅलड, सँडविच, आमटी किंवा इतर पदार्थ बनवू शकता.
सोयाबीनमध्ये अमीनो ऍसिड आढळून येते, जे खाल्ल्यामुळे शरीराची ताकद आणि ऊर्जा वाढते. त्यामुळे प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात सोयाबीन, टोफू इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता.