'या' पदार्थांच्या सेवनामुळे पोटात वाढते तीव्र उष्णता
तळलेल्या किंवा मसालेदार पदार्थांमध्ये चरबीचे प्रमाण खूप जास्त असते. पोटाला ही चरबी पचवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. खाल्ले अन्नपदार्थ पचन न झाल्यामुळे पोटात ऍसिडिटी वाढून शरीराला हानी पोहचते.
द्राक्ष, लिंबू, संत्री आणि टोमॅटो यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये नैसर्गिकरित्या आम्ल असते. त्यामुळे उपाशी पोटी आंबट फळांचे सेवन केल्यास शरीरात उष्णता वाढण्यासोबतच पित्ताचे प्रमाण सुद्धा वाढते.
सकाळी उठल्यानंतर अनेकांना चहा, कॉफी पिण्याची सवय असते. पण उपाशी पोटी चहा कॉफीचे सेवन केल्यास ऍसिडिटी वाढण्यासोबतच आंबट ढेकर येणे, आम्ल्पित्ता, छातीत जळजळ इत्यादी समस्या उद्भवू लागतात.
चॉकलेट आणि पेपरमिंट या दोन्ही पदार्थांमध्ये पित्ताचे प्रमाण जास्त असते. हॉट चॉकलेट किंवा पेपरमिंट खाल्ल्यामुळे काहीवेळा पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते.
चिप्स, पॅकेज्ड स्नॅक्स, बर्गर आणि पिझ्झा यांसारख्या जंक फूडमध्ये अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो. हे पदार्थ शरीराला हानी पोहचवतात.