झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री पूर्णिमा डे सध्या तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या झी मराठी नॉमिनेशन पार्टीतील तिचे खास फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत. आकाशी रंगाचा फ्लोरल गाऊन, मिनिमल मेकअप आणि कर्ली हेअरमधील तिचे खास फोटो पाहा.
आकाशी गाऊनमध्ये ‘अधिरा’चा ग्लॅमरस अंदाज; (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ फेम अभिनेत्री पूर्णिमा डे सध्या तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आहे. झी मराठी नॉमिनेशन पार्टीतील तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या खास सोहळ्यासाठी पूर्णिमाने आकाशी रंगाचा आकर्षक फ्लोरल डिझायनर गाऊन परिधान केला होता.

या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा मिनिमल मेकअप आणि मोकळ्या कर्ली केसांमुळे तिचा लूक अधिकच खुलून दिसत होता. तिच्या या स्टायलिश अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

पूर्णिमा डे सध्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत अधिरा ही भूमिका साकारत आहे. याआधी तिने ‘कुन्या राजाची गं तू राणी’, ‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘तुला पाहते रे’ यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

अभिनयासोबतच पूर्णिमा तिच्या स्टायलिश लूकमुळेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. झी मराठी नॉमिनेशन पार्टीतील तिच्या आकाशी गाऊनमधील खास फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.






