नाचणी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. नाचणीमध्ये कॅल्शियम, फायबर, प्रोटीन यांसारखे अनेक पौष्टिक घटक असतात. त्यामुळे आहारात डॉक्टरसुद्धा नाचणीचा समावेश करण्याचा सल्ला देतात. मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी नाचणीची भाकरी खूप जास्त गुणकारी ठरते. यामुळे रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. भरपूर फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. त्यामुळे नाचणीपासून केवळ भाकरीचं नाहीतर हे हेल्दी टेस्टी पदार्थ सुद्धा बनवू शकता. (फोटो सौजन्य – istock)
नाचणीच्या पिठापासून काय बनवावं सुचत नाही? मग झटपट तयार होणारे 'हे' पदार्थ नक्कीच बनवा

राज्यातील प्रत्येक भागात नाचणीचे आंबील आवर्जून बनवले जाते. सकाळच्या नाश्त्यात एक ग्लासभर नाचणीचे आंबील प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढेल आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.

लवकरच दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे साखरयुक्त पदार्थांचे सेवन करण्याऐवजी नाचणीपासून घरात नानकटाई बनवू शकता. सुका मेवा, नाचणीचे पीठ आणि इतर पदार्थांचा वापर करून बनवलेले नानकटाई सगळेच आवडीने खातील.

कायमच मैद्याचा केक खाऊन कंटाळा आल्यास झटपट हेल्दी टेस्टी नाचणीच्या पिठाचा केक बनवू शकता. नाचणीचे पीठ बाजारात सहज उपलब्ध होते आणि शरीरासाठी सुद्धा गुणकारी आहे.

वाटीभर नाचणीच्या पिठापासून खीर किंवा झटपट तयार होणारा हलवा सुद्धा बनवू शकता. नाचणीचे पीठ, दूध, सुका मेवा आणि गुळाचा वापर करून बनवलेला पदार्थ मधुमेहाचे रुग्ण सुद्धा खाऊ शकतात.

सकाळच्या नाष्ट्यात तांदळाची इडली खाण्याऐवजी नाचणीची इडली खावी. सांबर किंवा चटणीसोबत नाचणीची इडली चविष्ट लागते.






