अभिनेत्री रेखाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नेहमीच सक्रिय असते. तिला पाहता अजूनही अनेकांच्या हृदयात धडधड होते. वय फक्त एक संख्या! सौंदर्याचा तडका पाहायचा असेल तर @manishmalhotra05 या इंस्टाग्राम हॅण्डलवरून रेखाचे सुंदर फोटोशूट शेअर करण्यात आले आहे. हा सौंदर्याचा तडका तरुणांना चांगलाच भावला आहे.
रेखाचे नवे फोटोशूट शेअर करण्यात आले. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री रेखाचे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. तिचा हा लुक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे.
अभिनेत्रींचा हा लुक डिजाइनर मनीष मल्होत्राने त्याच्या @manishmalhotra05 सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे.
अभिनेत्रीने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. या अवतारामध्ये तिने परिधान केलेले अलंकार तिला आणखीन शोभिवंत करत आहेत आणि सौंदर्यात भर घालत आहेत.
पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'Pretty In Pink .. Iconic...' असे नमूद केले आहे. या डिजाईनचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कमेंट्समध्ये 'खूबसूरती का खजाना, हुस्न की परी...', 'sadabahaar khoobsurati' असे अनेक कमेंट्स केले आहेत.