संस्कृती बालगुडेने मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकताच संस्कृतीने आपला लुक बदलला असून तिचे फोटो पोस्ट केले आहेत. तिचा हा बोल्ड आणि ब्युटीफूल लुक अनेकांना आवडतोय. संस्कृतीने एक वेगळाच लुक करत सर्वांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून येत आहे. पाहा तिचा हा लुक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
संस्कृतीने वेस्टर्न लुक केला असून तिचा हा लुक खूपच बोल्ड आणि ब्युटीफूल दिसून येतोय. थोडा क्लासीपणाकडे जाणारा हा लुक पाहण्यासारखा आहे
ब्लॅक अँड रेड कॉम्बिनेशनमधील स्क्वेअर डिझाईनचा हा थाय स्लिट ड्रेस संस्कृतीने घातला असून त्याला वर व्हाईट टी-शर्ट जोडण्यात आले आहे
संस्कृतीने यासह ब्लॅक अँड व्हाईट लाँग सॉक्स आणि हाय हिल्स ब्लॅक शूज मॅच केले आहेत आणि ही स्टाईल कॅरी केली आहे
मोठा जाडसर लेदर ब्लॅक बेल्ट तिने पोटाजवळ लावला आहे, जेणेकरून या स्टाईलमध्ये अधिक आकर्षकता दिसेल आणि तिची परफेक्ट फिगरही फ्लाँट होईल
संस्कृतीचा हेअरकटदेखील या लुकसाठी परफेक्ट मॅच झालाय. तिने केसांना एक वळण देत हा लुक केलाय
मॅट मेकअप करत तिने डार्क लाल लिपस्टिक लावली असल्याने या ड्रेसला ती मॅच होत आहे. तर आयशॅडोसह तिने चेहऱ्याचा लुक पूर्ण केलाय