गायिका सावनी रवींद्र तिच्या गाण्यांनी मराठी रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. पण हे राज्य फक्त तिच्या आवाजाचे नाही तर तिचे निखळ सौंदर्य तरुणांना घायाळवर घायाळ करत आहे. सावनी तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडलेली तर असतेच पण या नव्या पोस्टने तर अक्षरशः धुमाकूळ केली आहे.
गायिका सावनी रवींद्र शेअर केली इंस्टाग्राम पोस्ट. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
गायिका सावनी रवींद्रने तिच्या @savanieeravindrra या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये गायिका फार सुंदर दिसत आहे.
गायिकेने या पोस्टमध्ये जांभळ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. त्यावर भारतीय साज केला आहे, जो अतिशय आकर्षक दिसत आहे.
ते सौंदर्य आभूषण तिच्या सौंदर्याला आणखीन उजाळा देत आहेत. गायिकेने पोस्टखाली सुंदर असे कॅप्शन दिले आहे.
'One of my favorite looks from the Shades of Womanhood series! ✨ Can you guess which song I wore this for? ' असे कॅप्शन करत 'नक्की कोणत्या गाण्यासाठी हा Look केला असल्याचा प्रश्न तिने चाहत्यांना केला आहे.
पोस्टखाली कॉमेंट्समध्ये सान्वीच्या चाहत्यांनी अमाप गर्दी केली आहे. आवाजाची जादू अनुभवत चाहते तिच्या रूपाची जादूही अनुभवत आहेत.