Vikram Solar IPO Marathi News: कोलकातास्थित सोलर मॉड्यूल निर्माता विक्रम सोलर पुढील आठवड्यात त्यांचा आयपीओ घेऊन येत आहे. सौर ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या विक्रम सोलरने ₹१,५०० कोटींचा नवीन इश्यू जारी केला आहे. हा आयपीओ १९ ऑगस्ट रोजी उघडेल आणि २१ ऑगस्टपर्यंत सबस्क्राइब करता येईल. या आयपीओची अँकर बुक १८ ऑगस्ट रोजी उघडेल. आतापर्यंत कंपनीने त्यांच्या आयपीओसाठी किंमत पट्टा जाहीर केलेला नाही, परंतु बाजार तज्ञांच्या मते तो प्रति शेअर ₹४००-₹४२० च्या आसपास असण्याची अपेक्षा आहे.