परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पांगरा लासिना गावात शेतकरी नरहरी पवाडे यांच्या शेतातून धूर निघत असल्याच्या प्रकार घडत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जमिनीतून धूर का निघत आहे याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. शेतकऱ्यांनी या बाबतची माहिती तहसील प्रशासनाला दिल्या नंतर तलाठी शिल्पा सरपे यांनी शेतात भेट देऊन पाहणी केली आहे. तर या बाबतची माहिती भूवैज्ञानिक विभागाला कळवण्यात आली आहे .त्यांच्या कडून पाहणी तपासणी केल्या नंतर नेमका प्रकार समोर येणार आहे.