तमन्ना भाटिया ही बॉलीवूड इंडस्ट्रीमधील एकआघाडीची अभिनेत्री आहे. तिने आजवर आयुष्यात अनेक चित्रपटात काम केले आहेत. ते सगळे चित्रपट चित्रपटगृहात सुपरहिट ठरलेले आहेत. तमन्नाने तामिळ, तेलगू आणि हिंदी या तिनी सिनेमासृष्टीत काम करून ती पुढे आली आहे.
तमन्ना आता नुकतीच ‘अरमानाई ४’ या तामिळ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. तमन्नाच्या प्रत्येक भूमिका या चाहत्यांच्या आवडत्या भूमिका ठरल्या आहेत. तसेच, तमन्ना आपल्या इंस्टहँडेलवर एक नवीन पोस्ट केली आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
तमन्ना ही नेहमी आपले फोटोज सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असते. तिने नुकतीच तिचे सोशल मीडियावर फोटोज पोस्ट केले आहेत. या फोटोजमध्ये तिचा लुक खूप युनिक आणि आकर्षित दिसत आहे.
तमन्नाने या फोटोज मध्ये पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा ड्रेस जलपरीच्या आकारात असून तिने या ड्रेसवर मॅचिंग असे ब्लेजर घातले आहे. हे ब्लेजर या ड्रेसवर खूप युनिक आणि आकर्षक दिसत आहे.
तमन्नाने सोबतच या ड्रेसवर मोहक असा मेकअपसुद्धा केला आहे. या ड्रेसवर तिने ब्रॉड आयलायनर, काजळ, न्यूड आयशॅडो, गुलाबी ब्लश आणि यासह न्यूड लिपस्टिक या सर्व सामग्रीचा वापर करून तिने खूप सुंदर लुक तयार केला आहे.
या ड्रेसवरील लुक अजून परिपूर्ण दिसण्यासाठी तिने हातात लांब सिल्व्हर अंगठ्या आणि कानात भरीव डिजाईनसह झुमका परिधान केला आहे. तमन्ना या बटर येल्लोव रंगाच्या ड्रेसवर आणि सोबतच ब्लेजरवर लेडी बॉस लुक तिने कॅरी केला आहे.