लवकरच सगळीकडे बाप्पाचे आगमन होणारे आहे. गणेशोत्सवाच्या सात दिवसांमध्ये अनेक ठिकाणी पूजा आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सणावाराच्या दिवसांमध्ये सर्वच महिला सुंदर नटून थटून तयार होतात. याशिवाय महिनाभर आधी साडीची खरेदी केली जाते. मात्र साडीवर नेमका कशा पद्धतीने ब्लाऊज शिवून घ्यावा किंवा कोणत्या डिझाईनचे आरी वर्क करावे? हे बऱ्याचदा सुचत नाही, म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आरी वर्क ब्लाऊजच्या सुंदर डिझाईन सांगणार आहोत. या डिझाईनचे ब्लाऊज पैठणी किंवा काठपदर साडीवर सुंदर दिसतील. (फोटो सौजन्य – Pinterest)
पैठणी- काठपदर साडीवर शोभून दिसतील 'या' डिझाईनचे आरीवर्क ब्लाऊज
साऊथ सिल्क किंवा सेमी पैठणी घेतल्यानंतर त्यावर तुम्ही अतिशय साधे आणि सोनेरी मण्यांचे आरी वर्क करून घेऊ शकता. हातांवर सुंदर सुंदर बारीक नक्षीकाम करून बनवलेली फुल उठावदार दिसतील.
अनेकांना ब्लाऊजवर एम्ब्रॉडरी खूप जास्त आवडते. त्यामुळे हिरव्या किंवा इतर रंगाच्या ब्लाऊजवर फुलांची किंवा इतर कोणत्याही डिझाईनची एम्ब्रॉडरी काढून घेऊ शकता.
पैठणी साडीवर ब्लाऊजवर या डिझाईनचे आरी वर्क अतिशय सुंदर दिसेल. बारीक बारीक मोती, रंगाची मणी आणि काच वर्क केलेली डिझाईन तुमच्या ब्लाऊजची शोभा आणखीनच वाढवेल.
सोन्याच्या जरीची किंवा रॉयल पैठणी साडी खरेदी केल्यानंतर त्यावर तुम्ही या डिझाईनचे नक्षीकाम करून सुंदर ब्लाऊज तयार करून घेऊ शकता. हातांवर आणि ब्लाऊजच्या पाठीमागील मोर उठावदार दिसतील.
धावपळीमध्ये अनेकांना ब्लाऊजवर नक्षीकाम करून देण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही ब्लाऊजच्या हातांवर सुंदर मण्यांचे किंवा मोत्याचे वर्क करू शकता.