Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Weather: ऐन उकाड्यात पुणेकरांना दिलासा; थंडी परतली असल्याने…

पुणे आणि परिसरात सोमवारी कमाल आणि किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर १५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात येणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 03, 2026 | 02:35 AM
Pune Weather: ऐन उकाड्यात पुणेकरांना दिलासा; थंडी परतली असल्याने…
Follow Us
Follow Us:
पुण्यातील तापमानात सातत्याने घट
पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला
दोन ते तीन दिवस हळूहळू तापमानात वाढ होणार

पुणे: गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. रविवारी (ता.१) देखील किमान तापमानामध्ये घट झाली. परिणामी त्यामुळे शहरात थंडी परतली असून पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पुढील दोन ते तीन दिवस हळूहळू पुणे शहरातील तापमानात वाढ  होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.शहर आणि परिसरात गेल्या पाच दिवसांत सहा अंश सेल्सिअसची घट झाली आहे. रविवारी (ता.१) किमान तापमानात किंचित वाढ होऊन १४.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.तर ३४ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविले गेले. त्यामुळे पहाटे आणि सायंकाळी थंडी वाढली आहे.मात्र कमाल तापमान स्थिर आणि आकाश निरभ्र असल्याने दुपारी कडक उकाड्याचा सामना करावा लागत आहे.पुढील दोन ते तीन दिवसांत किमान आणि कमाल तापमानामध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.पुणे आणि परिसरात सोमवारी (ता. २) कमाल आणि किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर १५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर सोमवारपासून (ता. २) कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.

Unseasonal Rain: अवकाळीमुळे ‘राजा’ संकटात; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा

छत्रपती संभाजीनगर शहराच्या कमालसोबतच किमान तापमानात सातत्याने वाढची नोंद होत आहे. रविवारी कमाल तापमानाने ३४ अंश पार केला आहे तर किमान तापमानातदेखील आठवडाभरात तब्बल साडेचार अंशाची वाढ झाली आहे. कमाल ३४. ६ आणि किमान तापमान २१. ४ अंश सेल्शियसची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. ऐन फेब्रुवारीत हिवाळा संपत असताना शहरात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Weather: संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! फेब्रुवारीतच पारा ३४ अंशांच्या पार; तज्ज्ञांनी दिला चिंतेचा इशारा

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरच सूर्य तळपू लागल्याने तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी नागरिकांना उष्णतेचा त्रास जाणवू लागला आहे. साधारणपणे फेब्रुवारीत वातावरण आल्हाददायक असते. मात्र यंदा कमाल तापमान ३४ अंशांच्या पुढे गेल्याने दुपारच्या वेळेत उन्हाचा तीव्र चटका जाणवत आहे. सकाळी आणि रात्री गारवा जाणवत असला, तरी दुपारनंतर शहरातील रस्ते, बाजारपेठा आणि वर्दळीच्या भागांत उष्णतेची तीव्रता वाढलेली दिसून येत आहे.

Web Title: Cold wave is back in pune city summer weather decrease weather marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Pune Weather
  • summer heat

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.