Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

अनेक ठिकाणी तलाव, विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. ग्रामीण भागात टँकरची मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे आत्ताच दिसत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 04, 2026 | 01:08 PM
मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह पुणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना उन्हाचा तीव्र चटका बसू लागला आहे. नेहमी एप्रिल-मे महिन्यात जाणवणारी उष्णतेची तीव्रता यंदा मार्चमध्येच जाणवत आहे. त्यामुळे शेती, पशुधन, पाणीपुरवठा आणि आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

अचानक वाढलेल्या तापमानामुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला यांसारख्या रब्बी पिकांवर ताण येत आहे. पिकांची वाढ खुंटणे, दाणे भरण्याची प्रक्रिया अपूर्ण राहणे, त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. फुलगळ व पानगळ वाढणे, उष्णतेमुळे जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत असून, शेतकऱ्यांना पिकांना अतिरिक्त पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे वीज वापर आणि इतर खर्च वाढत आहे. उन्हामुळे कुरणातील गवत लवकर वाळत आहे. हिरवा चारा कमी उपलब्ध होत असल्याने पशुपालकांना सुक्या चाऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन घटणे, जनावरांमध्ये अशक्तपणा, उष्माघाताचा धोका ही होण्याची शक्यता जाणकारांमधून व्यक्त होत आहे.

दरम्यान, अनेक ठिकाणी तलाव, विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. ग्रामीण भागात टँकरची मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे आत्ताच दिसत असून, पाण्यासाठी नागरिकांची धावपळ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शेतीसाठी पाणी सिंचनावर देखील मर्यादा पडण्याची शक्यता आहे.

नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे उष्माघात, डिहायड्रेशन, डोकेदुखी, त्वचारोग, रक्तदाबातील चढउतार यांसारख्या तक्रारी वाढू शकतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्रमिक वर्ग यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे ठरणार आहे. त्यासाठी दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे, भरपूर पाणी व द्रवपदार्थ घ्यावेत, डोक्यावर टोपी/रुमाल वापरावा, जनावरांना सावली व स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे.

प्रशासनाकडून अपेक्षित उपाययोजना

सुरु असलेल्या कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे योग्य ते नियोजन,प्रसंगी जनावरांसाठी चारा छावण्यांची तयारी, आरोग्य शिबिरे, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व मदत मिळणे गरजेचे असेल. मार्चच्या सुरुवातीलाच वाढलेली उष्णता ही आगामी एप्रिल-मे महिन्यात अधिक तीव्र होण्याची शक्यता दर्शवत आहे. त्यामुळे प्रशासन, शेतकरी आणि नागरिकांनी आतापासूनच दक्षता घेणे आवश्यक ठरत आहे.

हेदेखील वाचा : Samruddhi Expressway: समृद्धी महामार्गावर शिवडे येथे इंटरचेंज, एमएसआरडीसी-सार्वजनिक बांधकाम विभागाची चाचपणी

Web Title: Intense heatwave in early march serious impact on agricultural crops and animal fodder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • Climate Change
  • summer heat
  • Weather Update

संबंधित बातम्या

Climate Change : मानवी मूत्रामुळे वितळत आहेत ग्लेशियर? माउंट एव्हरेस्टवरील संशोधनातून समोर आला थक्क करणारा खुलासा
1

Climate Change : मानवी मूत्रामुळे वितळत आहेत ग्लेशियर? माउंट एव्हरेस्टवरील संशोधनातून समोर आला थक्क करणारा खुलासा

Nepal Climate Crisis : ‘मदत नाही, कर्ज फेडा’; नेपाळच्या नुकसानभरपाईच्या मागणीला ग्रेटा थनबर्ग यांचा पाठिंबा
2

Nepal Climate Crisis : ‘मदत नाही, कर्ज फेडा’; नेपाळच्या नुकसानभरपाईच्या मागणीला ग्रेटा थनबर्ग यांचा पाठिंबा

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
3

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

 Global Food Crisis : जगभरातील अन्न महागाईचा नवा धोका; युद्ध, हवामान बदलाने पुरवठ्यावर मोठा परिणाम
4

 Global Food Crisis : जगभरातील अन्न महागाईचा नवा धोका; युद्ध, हवामान बदलाने पुरवठ्यावर मोठा परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.