Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कोणते पेय ठरतात प्रभावी? लिंबू पाणी की आवळा ज्यूस…

वाढत्या उन्हाळ्यात शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी लिंबू पाणी किंवा आवळ्याचे सरबत सेवन केले जाते. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. जाणून घ्या लिंबू पाणी आणि आवळा सरबत पिण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 02, 2026 | 08:35 AM
वाढत्या उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कोणते पेय ठरतात प्रभावी? लिंबू पाणी की आवळा ज्यूस...

वाढत्या उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कोणते पेय ठरतात प्रभावी? लिंबू पाणी की आवळा ज्यूस...

Follow Us
Close
Follow Us:

लिंबू पाणी पिण्याचे फायदे?
आवळ्याचा रस पिण्याचे फायदे?
उन्हाळ्यात कोणते पेय प्रभावी ठरते?

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर अंगाची काहिली होते. कडक उन्हात बाहेर फिरून आल्यानंतर काहींना डोकेदुखीची समस्या उद्भवते. सतत येणाऱ्या कडक घामामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. सतत येणाऱ्या घामामुळे शरीर पूर्णपणे डिहायड्रेट होऊन जाते. अशावेळी सगळेच बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या सरबत किंवा कोल्ड्रिंकचे सेवन करतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर थंड पेय प्यायली जातात. पण थंड पेयांचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी न होता आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. बाजारात मिळणारी थंड पेय शरीराची तहान भागवतात, पण शरीरात थंडावा निर्माण करत नाहीत. या पेयांमध्ये मोठ्या प्रमाणावर साखर आणि घटक आढळून येतात, ज्याचा शरीराला फारसा फायदा होत नाही. वेगवेगळ्या रासायनिक रंगांचा वापर करून बनवलेल्या पेयांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या नैसर्गिक पेयांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात शरीरासाठी लिंबू पाणी प्रभावी ठरते की आवळ्याचे सरबत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

वाढत्या कोलेस्टरॉलमुळे कोरोनरी आर्टरी डिसिजचा अनेकांच्या जीवाला धोका! ‘ही’ लक्षणे दिसताच वेळीच करा उपचार

नैसर्गिक पेयांचे सेवन केल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक लोक लिंबू सरबत पितात. लिंबू सरबत किंवा आवळ्याचे सरबत प्यायल्यामुळे आरोग्य सुधारते. उन्हाळ्यात या दोन्ही पेयांचे आवर्जून सेवन केले जाते. लिंबू सरबत प्यायल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यास मदत करते तर आवळ्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. या दोन्ही पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विटामिन सी असलेल्या पेयांचे सेवन केल्यास शरीरासह त्वचेला सुद्धा फायदे होतील. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. पण आरोग्यासाठी लिंबू पाणी की, आवळा सरबत?

लिंबू पाणी पिण्याचे फायदे:

घरात कायमच लिंबू उपलब्ध असतात. एक ग्लासभर पाण्यात लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ, थोडीशी साखर मिक्स करून सरबत बनवले जाते. लिंबू पाणी प्यायल्यामुळे शरीरात तात्काळ ऊर्जा मिळते. याशिवाय सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील क्षार बाहेर पडून जातात, ज्यामुळे थकवा जाणवतो. अशावेळी लिंबू पाणी प्यायल्यास शरीरातील क्षारांची पातळी भरून निघते. लिंबू पाणी प्यायल्यामुळे शरीरात वाढलेली ऍसिडिटी आणि अपचनाचा त्रास कमी होतो. यामध्ये असलेले विटामिन सी शरीर हायड्रेट ठेवते आणि उन्हामुळे आलेला काळपटपणा कमी करण्यास मदत करते.

मूळव्याध होईल मुळांपासून नष्ट! आतडे स्वच्छ करण्यासाठी नियमित खा ‘हे’ फायबरयुक्त पदार्थ, बद्धकोष्ठता होईल दूर

आवळ्याचा रस पिण्याचे फायदे:

आयुर्वेदानुसार, आवळा शरीरासाठी अमृता समान मानला जातो. आवळा अतिशय थंड असल्यामुळे नियमित आवळ्याचे सेवन केल्यास शरीराला खूप जास्त फायदे होतात. एका आवळ्यामध्ये साधारण २० लिंबांइतके विटामिन सी असते. त्यामुळे नियमित एक आवळा खावा. शरीराची झीज भरून काढण्यासाठी आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच उपाशी पोटी आवळ्याचा रस प्यायल्यास रक्तातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. उन्हाळयात येणारी घामोळे कमी करण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे. उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर तर पित्ताचा त्रास, डोळ्यांची जळजळ किंवा पित्ताचा खूप जास्त त्रास होत असेल तर आवळ्याचे सरबत प्यावे. यामुळे उष्णता कमी होईल आणि आरोग्य सुधारेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: उष्माघातापासून बचाव कसा करावा?

    Ans: जास्त वेळ उन्हात राहणे टाळा, घरातून बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवा.

  • Que: उन्हाळ्यात काय खावे आणि प्यावे?

    Ans: कलिंगड काकडी टरबूज यांसारखे पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खा.

  • Que: उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

    Ans: पुरेशी झोप घ्या आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी तणावमुक्त राहा.

Web Title: Which drinks are effective in reducing body heat in growing summer lemon water or amla juice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 08:35 AM

Topics:  

  • Amla juice Benefits
  • lemon juice
  • summer care tips
  • summer drink

संबंधित बातम्या

राज्यात उष्माघात रुग्णांची संख्या १५ वर! अकोला, वाशिम येथे दोन जणांचा बळी; निम्म्या राज्याचे तापमान ४० अंशांवर
1

राज्यात उष्माघात रुग्णांची संख्या १५ वर! अकोला, वाशिम येथे दोन जणांचा बळी; निम्म्या राज्याचे तापमान ४० अंशांवर

पिवळ्या रंगांच्या केळ्यांपेक्षा लाल केळी जास्त गुणकारी! रोजच्या आहारात नियमित करा सेवन, राहाल कायम फिट
2

पिवळ्या रंगांच्या केळ्यांपेक्षा लाल केळी जास्त गुणकारी! रोजच्या आहारात नियमित करा सेवन, राहाल कायम फिट

ताक, सरबत पिऊन कंटाळा आला असेल तर संत्र्याच्या रसापासून बनवा रिफ्रेशिंग Orange Soda, नोट करून घ्या रेसिपी
3

ताक, सरबत पिऊन कंटाळा आला असेल तर संत्र्याच्या रसापासून बनवा रिफ्रेशिंग Orange Soda, नोट करून घ्या रेसिपी

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले गुलाब पाणी शरीरासाठी ठरेल फायदेशीर! पोटात थंडावा राहण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो
4

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले गुलाब पाणी शरीरासाठी ठरेल फायदेशीर! पोटात थंडावा राहण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.