चुकीची जीवनशैली, वाढलेले वजन आणि शरीरसंबंधित आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी सतत काहींना काही केले जाते. कधी आहारात बदल केला जातो तर कधी व्यायाम आणि वेगवेगळी सप्लिमेंट्स प्यायली जातात. पण आहारात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य आणखीनच बिघडण्याची शक्यता असते. सकाळच्या नाश्त्यात बऱ्याचदा चहा बिस्कीट किंवा टोस्ट, तेलकट पदार्थ खाल्लेले जातात. पण त्याऐवजी शरीराला पोषण देण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात स्मूदीचा समावेश करावा. चला तर जाणून घेऊया सकाळच्या नाश्त्यासाठी कोणत्या पौष्टिक स्मूदी प्याव्यात. (फोटो सौजन्य – istock)
दिवसाची सुरुवात होईल आंनदाने! वाढलेल्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी नाश्त्यात करा 'या' पौष्टिक स्मूदीचे सेवन

पालक, सफरचंद, अवोकाडो, चिया सीड्सपासून बनवलेल्या स्मूदीचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. पालकमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीरावरील चरबी कमी होते.

शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा दूर करण्यासाठी बेरीजपासून बनवलेली स्मूदी फायदेशीर ठरेल. कारण बेरिजमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि मेटाबॉलिझम सुधारणारे आवश्यक घटक असतात.

सकाळच्या नाश्त्यात नियमित एक ग्लास अननस, केळी, हळद आणि खोबऱ्याच्या दुधापासून बनवलेल्या स्मूदीचे सेवन केल्यास आठवडाभरात अनेक सकारात्मक परिणाम शरीरावर दिसून येतील.स्मूदी प्यायल्यामुळे पोट भरलेले राहते.

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट स्मूदी प्यायला खूप जास्त आवडते. कॅको पावडर, प्रोटीन पावडर, पीनट बटर आणि दुधाचा वापर करून बनवलेली स्मूदी स्नायूंची वाढ आणि पुनर्बांधणी करण्यास मदत करते.

उन्हाळ्याच्या दिवसांमधे शरीर रिफ्रेशिंग ठेवण्यासाठी काकडीचा वापर करून बनवलेली स्मूदी प्यावी. यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होते आणि शरीरात थंडावा राहतो.






