श्रावण महिन्याला सुरुवात होण्याआधी संपूर्ण महाराष्ट्रात गटारी अमावस्या साजरा केली जाते. यादिवशी घरात वेगवेगळे नॉनव्हेज पदार्थ अतिशय आवडीने बनवले जातात. कारण संपूर्ण श्रावण महिना अजिबात मांसाहारी पदार्थ खाल्ले जात नाहीत. यंदाच्या वर्षी १३ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे यंदाच्या गटारी अमावस्येला घरात हे पदार्थ नक्कीच बनवा. तुम्ही बनवलेले पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच तुमचं कौतुक करतील आणि गटारी साजरा केल्याचा आनंद मिळेल. (फोटो सौजन्य – istock)
गटारी अमावस्येनिमित्त नॉनव्हेज पदार्थ

गटारीला प्रामुख्याने चिकन, मटणपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. अनेकांना मटण खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही झणझणीत कोल्हापुरी चिकन सुक्का किंवा मालवणी चिकन रस्सा बनवू शकता.

भारतासह जगभरात सगळीकडे मासेप्रेमी आहेत. पापलेट फ्राय, बांगडा फ्राय, सुरमई फ्राय इत्यादी चुरचुरीत तळलेले मासे भाकरी किंवा चपातीसोबत अतिशय चविष्ट लागतात.

सगळ्यांच्या अतिशय आवडीचा पदार्थ म्हणजे रवा कोळंबी फ्राय. चकणा म्हणून सुद्धा कोळंबी फ्राय खाल्ले जातात. लहान मुलंसुद्धा कोळंबी आवडीने खातात.

मटण खाणाऱ्या लोकांना स्टास्टर्ससाठी मटण चॉप्स उत्तम पर्याय आहे. याशिवाय भाकरी, चपातीसोबत खाण्यासाठी मटण रस्सा किंवा मटण सुक्का सुद्धा बनवू शकता.

मांसाहारी पदार्थ खाल्ल्यानंतर ते सहज पचन होण्यासाठी सोलकढी आवर्जून प्यायली जाते. कोकम आणि जिरं, खोबऱ्याचा किस वापरून बनवलेला पदार्थ पचनासाठी उत्तम मानला जातो.






