तुमच्या फोनमध्ये दडलंय सोनं! अनेकांना ठाऊक नाही याची जागा, पण तुम्ही माहिती करून घ्या
सोनं हे एक उत्तम पाॅवर कंडक्टर आहे, ते गंजत नाही आणि उष्णता सहज सोडते. फोनमध्ये साधारण 0.034 ग्रॅम सोन्याचा वापर केला जातो. म्हणजेच 41 स्मार्टफोनमधून एक ग्रॅम सोन बाहेर काढता येईल
वायरिंगमध्ये तांब्याचा वापर केला जातो तर सर्किट लाइन्समध्ये चांदीचा वापर होतो. कोबाल्ट, लिथियचा बॅटरीमध्ये आणि कूलिंगसाठी वापर केला जातो.
फोन, लॅपटाॅप, टिव्ही, रेडिओ यांसारख्या उपकरणांमध्ये सोन्याचा वापर केला जातो. 1 टन ई-कचऱ्यातून 200-300 ग्रॅम सोन बाहेर काढता येऊ शकते
सर्किट बोर्ड, कनेक्टर्स आणि चिप्स, कॅबल्स आणि पोर्ट्स या भागांमध्ये सोन्याचा वापर केला जातो. हे सिग्नल ट्रान्सफर जलद आणि स्थिर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.
तुमचा जुना झालेला फोन फेकू नका तर सर्टिफाईड ई-वेस्ट रिसायकलरकडे त्यांना द्या. भारतात Attero, E-Parisara सारखे प्लॅटफाॅर्म्स आहेत जिथे तुम्ही तुमचे जुने मोबाईल किंवा इलेक्ट्राॅनिक उपकरणे रिसाईकल करु शकता