Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus चाहत्यांसाठी खुशखबर! मिड-रेंज सीरिजची प्री-बुकिंग सुरू, लाँचला अवघे काहीच दिवस शिल्लक

OnePlus Turbo Series: OnePlus ची नवीन स्मार्टफोन सिरीज लवकरच चीनमध्ये लाँच केली जाणार आहे. या स्मार्टफोनचे काही डिटेल्स सोशल मीडियावर लीक झाले आहेत. यामध्ये Snapdragon 7 series चिपसेट असू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 28, 2025 | 12:19 PM
OnePlus चाहत्यांसाठी खुशखबर! मिड-रेंज सीरिजची प्री-बुकिंग सुरू, लाँचला अवघे काहीच दिवस शिल्लक

OnePlus चाहत्यांसाठी खुशखबर! मिड-रेंज सीरिजची प्री-बुकिंग सुरू, लाँचला अवघे काहीच दिवस शिल्लक

Follow Us
Close
Follow Us:
  • OnePlus च्या या मिड-रेंज सीरीजची प्री-बुकिंग सुरु
  • आगामी डिव्हाईसमध्ये Snapdragon 7 series चिपसेट असण्याची शक्यता
  • OnePlus Turbo चे फोटो देखील ऑनलाईन लीक
OnePlus Turbo सिरीज लवकरच लाँच होणार आहे. लाँचिंगपूर्वीच या सिरीजचे अनेक स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स ऑनलाईन लीक झाले आहेत. त्यामुळे या आगामी सिरीजच्या लाँचिंगसाठी सर्वजण उत्सुक आहेत. OnePlus Turbo सिरीजची लाँच डेट अद्याप जाहिर करण्यात आली नाही. मात्र OnePlus Turbo सिरीजची प्री-बुकिंग सुरु झाली आहे. चीनी स्मार्टफोन मेकरने अधिकृतपणे पुष्टी केली आहे की, चीनमध्ये लवकरच OnePlus Turbo सीरीज लाँच केली जाणार आहे. याशिवाय, हि लाइनअप आता देशात Oppo China ऑनलाईन स्टोअरद्वारे प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. हे OnePlus Turbo चे फोटो देखील ऑनलाईन लीक झाले होते. त्यानंतर लगेचच कंपनीने स्मार्टफोन सिरीजच्या प्री बुकींगला सुरुवात केली.

कमी किंमत, जबरदस्त आवाज! Xiaomi चे नवे ईयरबड्स लाँच, 35 तासांची दमदार बॅटरी आणि Harman-ट्यून्ड ऑडिओची धमाल

OnePlus Turbo च्या लीक झालेल्या फोटोंवरून असा अंदाज लावला जात आहे की, या आगामी स्मार्टफोनमध्ये एक चौकोनी आकाराचा ड्युअल रियर कॅमेरा युनिट असू शकते. याशिवाय या आगामी डिव्हाईसमध्ये Snapdragon 7 series चिपसेट देखील दिला जाण्याची शक्यता आहे, जो 9,000mAh बॅटरीला सपोर्ट करणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

OnePlus Turbo सीरीज चीनमध्ये लवकरच होणार लाँच

वीबोवर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये चीनी स्मार्टफोन मेकरने पुष्टी केली आहे की, OnePlus Turbo सीरीज लवकरच चीनमध्ये लाँच केली जाणार आहे. मात्र टेक फर्मने अद्याप अपकमिंग लाइनअपच्या मुख्य स्पेसिफिकेशन्स, फीचर्स, डिझाइन, कलर आणि लाँच डेटबाबत कोणतीही माहिती शेअर केली नाही. याशिवाय OnePlus Turbo सीरीजमध्ये कोणते स्मार्टफोन्स मॉडेल्स लाँच केले जाणार आहे आणि त्यांचे नाव काय असणार, याबाबत देखील अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. येत्या काहीच दिवसांत स्मार्टफोनचे फीचर्स आणि लाँच डेट जारी केली जाण्याची शक्यता आहे.

OnePlus Turbo सीरीजची प्री-बुकींग सुरु

OnePlus Turbo सीरीज आता चीनमध्ये Oppo ऑनलाईन स्टोअरद्वारे प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. देशात हा स्मार्टफोन CNY 1 म्हणजेच सुमारे 13 रुपये टोकन किंमत देऊन बुक केला जाऊ शकतो. तथापी, लिस्टिंगमध्ये स्मार्टफोनबाबत इतर कोणतीही माहिती देण्यात आली नाही. टेक फर्मने Weibo वर खुलासा केला आहे की लवकरच लाँच होणारी OnePlus Turbo सीरीज मिड-रेंज फोन म्हणून लाँच केली जाणार आहे.

OnePlus Turbo सिरीजचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स लीक

अलीकडेच, OnePlus Turbo चे कथित रेंडर ऑनलाईन लीक झाले आहेत. स्मार्टफोन हिरव्या रंगात होल-पंच कटआउट डिस्प्लेसह पाहायला मिळाला होता, ज्यामध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंट-फेसिंग कॅमेरा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन एका चौकोनी आकाराच्या रियर कॅमेरा मॉड्यूलसह पाहायला मिळाला. लीक झालेल्या फोटोंवरून असे दिसून येते की हँडसेटच्या उजव्या बाजूला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम कंट्रोल असतील, तर डावी बाजू रिकामी असेल. मागील पॅनल देखील प्लास्टिकचे बनलेले असण्याची अपेक्षा आहे.

BSNL Recharge Plan: नव्या वर्षानिमित्त टेलिकॉम कंपनीची खास ऑफर! या प्लॅन्समध्ये यूजर्सना फ्री मिळणार 100GB डेटा, असा घ्या फायदा

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, लीक झालेल्या रिपोर्टनुसार, OnePlus Turbo मध्ये 1.5K रेजोल्यूशन आणि 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सह 6.8-इंच AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. या आगामी डिव्हाईसमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 7s Gen 4 चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं आहे की, फोनमध्ये 9,000mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जो 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. भारतासह निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये नॉर्ड लाइनअपचा भाग म्हणून हे स्मार्टफोन्स लाँच होण्याची अपेक्षा आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: OnePlus च्या मुख्य स्मार्टफोन सिरीज कोणत्या?

    Ans: OnePlus Number Series, OnePlus Nord Series आणि OnePlus CE Series.

  • Que: OnePlus Number Series कशासाठी ओळखली जाते?

    Ans: फ्लॅगशिप फीचर्स आणि प्रीमियम परफॉर्मन्ससाठी.

  • Que: OnePlus Nord Series कोणासाठी आहे?

    Ans: मिड-रेंज बजेटमध्ये प्रीमियम अनुभव हवा असलेल्या युजर्ससाठी.

Web Title: Oneplus turbo series pre booking starts features and specifications leak online tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 12:19 PM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

लॅपटॉपवर कव्हर लावणं योग्य की टेम्पर्ड ग्लास? एक चुकीचा निर्णय आणि तुम्हीही कराल पश्चाताप! जाणून घ्या फायदे आणि नुकसान
1

लॅपटॉपवर कव्हर लावणं योग्य की टेम्पर्ड ग्लास? एक चुकीचा निर्णय आणि तुम्हीही कराल पश्चाताप! जाणून घ्या फायदे आणि नुकसान

Google चा गेम-चेंजर अपडेट! अकाऊंट अ‍ॅक्सेस न गमावता बदलू शकता ई-मेल अ‍ॅड्रेस, यूजर्सना असा होणार फायदा
2

Google चा गेम-चेंजर अपडेट! अकाऊंट अ‍ॅक्सेस न गमावता बदलू शकता ई-मेल अ‍ॅड्रेस, यूजर्सना असा होणार फायदा

Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! गेममध्ये झाली Moco Store ची एंट्री, फ्रीमध्ये क्लेम करा जिंजरब्रेड मॅन बंडल
3

Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! गेममध्ये झाली Moco Store ची एंट्री, फ्रीमध्ये क्लेम करा जिंजरब्रेड मॅन बंडल

Tech Tips: हिवाळ्यात गिझर बनू शकतो टाईमबॉम्ब! एक छोटी चूक आणि होऊ शकतो मोठा धमाका, असं राहा सुरक्षित
4

Tech Tips: हिवाळ्यात गिझर बनू शकतो टाईमबॉम्ब! एक छोटी चूक आणि होऊ शकतो मोठा धमाका, असं राहा सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.