२०२५ मध्ये अनेक सेलिब्रिटींचे विवाह पार पडले. या विवाह सोहळ्यांमध्ये अभिनेत्रीने केलेले लुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. लग्नातील प्रत्येक लुक, दागिने, लग्न सोहळ्यातील सजावट खास आकर्षणाचा विषय ठरला होता. लग्नात केलेले लुक अनेक नव वधूवरांसाठी प्रेरणा देणारे ठरले . लग्नात केलेली फॅशन केवळ जड लेहेंग्यांपुरती मर्यादित नसून आराम, व्यक्तिमत्व आणि टिकाऊपणा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. चला तर पाहुयात २०२५ साठी नवीन फॅशन ट्रेंड सेट करणाऱ्या या सेलिब्रिटीचे व्हायरल लुक. (फोटो सौजन्य – pinterest)
२०२५ मध्ये 'या' अभिनेत्रींच्या ब्रायडल लुकची सोशल मीडियावर होतील मोठी चर्चा

अभिनेत्री आदिती हैदरीने तिच्या विवाह सोहळ्यात परिधान केलेल्या पांढऱ्या लेहेंग्याची आणि दागिन्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. त्यात तिने साऊथ इंडियन लुक केला होता.

हल्ली सर्वच विवाह सोहळ्यांमध्ये लेहेंगा किंवा डिझाईनर गाऊन घालता जातो. मात्र अभिनेत्री सामंथा प्रभूने विवाह सोहळ्यात लाल रंगाची बनारसी साडी, पांढऱ्या फुलांचा गजरा आणि सोन्याचे सुंदर दागिने घातले होते.

२०२५ मध्ये लग्न झालेल्या अभिनेत्रींनी फॅशन आणि लग्नसोहळ्यातील लुक करताना कोणतीही कॉपी केल्याचे दिसून आले नाही. अभिनेत्री हिना खानाने तिच्या लग्नातील साडीवर नवऱ्याचे नाव सुद्धा कस्टमाइज केले होते.

अभिनेत्री प्राजक्ता कोळीने मराठी आणि नेपाळी पद्धतीमध्ये विवाह सोहळा केला. तिचा नेपाली लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

लग्नात कायमच लाल, पिवळा किंवा गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला जातो. पण गायक अरमान मलिकची पत्नी आशना श्रॉफ हिने विवाह सोहळ्यात नारंगी रंगाचा लेहेंगा परिधान करून सुंदर स्टोनचे दागिने परिधान केले होते.






