आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मधून कोपरखैरणे येथील शिरीष पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अर्ज भरल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर कडाडून टीका केली आहे. यावेळी शिरीष पाटील यांनी प्रभागातील विकासकामांच्या टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले. “प्रभागातील अनेक कामांचे टेंडर ठराविक लोकांनाच दिले जात असून यामध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच घराणेशाहीमुळे सामान्य कार्यकर्ते आणि नागरिकांचे प्रश्न दुर्लक्षित राहात असल्याचेही त्यांनी नमूद केले.