'कराडमध्ये आघाडीचा निर्णय अपेक्षेप्रमाणे ठरला'; जयंत पाटील यांचे विधान (संग्रहित फोटो)
कराड : कराड नगरपालिका निवडणुकीसाठी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी पालिकेचा निकाल जाहीर झाला होता. अपेक्षेप्रमाणे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून राजेंद्रसिंह यादव यांचा दणदणीत विजय झाला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजेंद्रसिंह यादव यांचे कौतुक केले.
जयंत पाटील हे कराड दौऱ्यावर आले असता त्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी नगरसेवक विजयसिंह यादव, प्रशांत यादव, मोहन कदम, रूपेश मुळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी स्थानिक राजकारणापासून ते आगामी महापालिका निवडणुकांपर्यंत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, राजेंद्रसिंह यादव यांचा लोकसंग्रह मोठा व भक्कम असून, त्यांच्या विजयाने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शहराच्या वर्तमान व भविष्यातील विकासाचा विचार करून माजी मंत्री बाळासाहेब पाटील व यादव एकत्र आले.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: मोठी बातमी! “भाजपच्या अहंकारामुळे युती तोडतोय…”, शिंदेसेना–भाजप युतीत मोठा स्फोट, ‘या’ नेत्याने केली घोषणा
दरम्यान, या विश्वासार्ह आघाडीला नागरिकांनी निर्विवाद कौल दिला. नगराध्यक्षपदासाठी यादव यांना नऊ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले असून, हा विजय म्हणजे जनतेने टाकलेला विश्वास आहे. या विश्वासास पात्र ठरण्याची जबाबदारी आता नवनिर्वाचित नेतृत्वावर आहे. विकासाभिमुख कार्यक्रम हाती घेतले जातील, असा मला पूर्ण विश्वास आहे, असेही पाटील यांनी यावेळी नमूद केले.
मुंबईत भाजप-शिवसेना एकत्र
मुंबईत महायुती म्हणून भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत. सूत्रांनुसार, या युतीत भाजपसाठी १२८ तर शिंदे गटासाठी ७९ जागा निश्चित आहेत. उर्वरित २० जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. याचदरम्यान छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. संभाजीनगरमधील महायुती अखेर तुटली आहे. आम्ही विश्वास ठेवला पण भाजपने विश्वासघात केला, अशा शब्दांत राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: भाजपा-शिवसेनेत युतीची चर्चा; निवडणुकीत दोन्ही पक्षांत बंडखोरी, नाराजीनाटय रोखण्याचे नेत्यांपुढे आव्हान






