त्वचेचे सौंदर्य वाढवण्यास मदत करतील 'हे' collagen युक्त पदार्थ
कोलेजन वाढवण्यासाठी आहारात सोया मिल्क, सोयाबीन किंवा सोया उत्पादनाचे सेवन करावे. यामुळे त्वचेमधील कोलेजन वाढण्यास मदत होते. शाहाकारी लोकांनी आहारात सोया उत्पादनाचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील.
रोजच्या आहारात सॅल्मन, ट्यूना आणि सार्डिन यांसारख्या माशांचे सेवन करावे. या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड, कोलेजन मोठ्या प्रमाणावर आढळून येते.
अंड खाणे अनेकांना आवडत नाही. मात्र कोलेजन वाढवण्यासाठी तुम्ही अंड्याच्या वरील भागाचे नियमित सेवन केल्यास काही दिवसांमध्ये फरक दिसून येईल. त्यामुळे आहारात नेहमी दोन अंड्यांचे सेवन करावे.
शरीरात नैसर्गिकरित्या कोलेजनचे उत्पादन वाढवण्यासाठी हेझलनट, बदाम, अक्रोड, सोया, कॅनोला, सूर्यफूल बिया, काजू इत्यादी ड्रायफ्रूटचे नियमित सेवन करावे. ड्रायफ्रूट आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
रोजच्या आहारात आंबट फळांचे सेवन करावे. आंबट फळांमध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर असते. लिंबू, संत्री आणि टेंजेरिन इत्यादी फळांचे सेवन केल्यास कोलेजन उत्पादनात वाढ होईल.