प्रेशर कुकरमध्ये शिजवलेले 'हे' पदार्थ आरोग्यासाठी ठरतात विष
कडधान्य किंवा इतर भाज्या कुकरमध्ये शिजवू नये. कडधान्य कुकरमध्ये शिजवल्यामुळे त्यात टॉक्सिन तयार होतात, ज्यामुळे पचनक्रिया बिघडते. दूध, पास्ता, सोयाबीन, पालेभाज्या कुकरमध्ये शिजवलेल्यामुळे पचनक्रिया बिघडते.
तुपाचा वापर करून कुकरमध्ये पदार्थ बनवू नये. उच्च दाब आणि तापमानामुळे तुपाचे फॅटी ॲसिड्स वेगळे होऊन त्यातील पोषण मूल्य कमी होऊन जातात. जे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.
हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. पण हिरव्या पालेभाज्या कुकरमध्ये शिजवल्यामुळे त्यातील पोषण मूल्य कमी होऊन त्यामध्ये हानिकारक घटक तयार होऊ लागतात. नायट्रेट्सचे प्रमाण वाढल्यामुळे पदार्थाची चव खराब होऊन जाते.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पास्ता खायला खूप आवडतो. मात्र घाईगडबडीच्या वेळी पास्ता कुकरमध्ये शिजवून बनवला जातो. असे केल्यामुळे पास्ता कुकरला चिकटत जातो.
दूध किंवा दुधाचे पदार्थ बनवताना कढई किंवा टोपाचा वापर करावा. प्रेशर कुकरमध्ये दुधाचे पदार्थ शिजवल्यामुळे त्यातील पोषण मूल्य कमी होऊन जातात. याशिवाय कुकरमध्ये दूध लगेच गरम होते आणि कुकरला तसेच चिटकून राहते, ज्यामुळे कुकर खराब होऊ शकतो.