जगभरात प्रसिद्ध आहेत 'हे' नाश्त्यातील गुजराती पदार्थ
खांडवी हा गुजराती पदार्थ आहे. बेसन, दही, पाणी, हळद आणि मीठ इत्यादी पदार्थ मिक्स करून ते वाफेवर शिजवले जातात आणि त्यानंतर रोल करून त्यावर मोहरीची फोडणी दिली जाते.
हँडवो हा पदार्थ आपल्यातील अनेकांना माहित नसेल. पण गुजरातमध्ये हँडवो हा पदार्थ अतिशय फेमस आहे. भोपळा, मसूर आणि ताकपासून बनवलेल्या पदार्थाची चव आंबटगोड लागते.
सकाळच्या नाश्त्यात अनेक लोक फाफडा खातात. चहा आणि फाफड्याचे कॅबिनेशन सगळ्यांचं खूप जास्त आवडते. याशिवाय सणावाराच्या दिवसांमध्ये नाश्त्यात घरी जिलेबी, फाफडा आणला जातो.
बाजरीचे पीठ आणि ताज्या मेथी दाण्यांचा वापर करून बाजरीची मेथी रोटी बनवली जाते. गुजरातमध्ये हा पदार्थ खूप जास्त प्रसिद्ध आहे. बाहेर जाताना किंवा जेवणाच्या डब्यात तुम्ही ही रोटी नेऊ शकता.
गुजराती थेपला खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. हा पराठ्यासारखा असतो. बेसन आणि इतर वेगवेगळ्या पिठाचा वापर करून बनवलेले थेपला चवीला अतिशय सुंदर लागतो.