कायम फिट आणि तरुण दिसण्यासाठी खायला हवेत 'हे' पौष्टिक पदार्थ
आहारात तुम्ही स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी आणि क्रॅनबेरी इत्यादींचे सेवन करू शकता. यामध्ये असलेले अॅंटी-ऑक्सिडेंट्स ब्रेस्ट कॅन्सरपासून शरीराचा बचाव करतात. बेरीजमध्ये असलेले विटामिन सी त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे.
शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात दह्याचे सेवन करावे. दही खाल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. पोटामध्ये चांगल्या बॅक्टरीयाच्या वाढीसाठी दह्याचे सेवन करावे.
महिलांच्या आरोग्यासाठी टोमॅटो अतिशय गुणकारी मानले जाते. टोमॅटोमध्ये असलेले गुणधर्म शरीरासह त्वचेला पोषण देतात. त्वचा तरूण, ग्लोईंग आणि चमकदार ठेवण्यासाठी नियमित एक टोमॅटो खावे.
अॅवोकाडो खाणे आपल्यातील अनेकांना आवडत नाही. पण यामध्ये विटामिन, मिनरल्स, फायबर आणि हेल्दी फॅट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. शरीराला आलेली सूज, मेटाबॉलिक सिंड्रोमसारख्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी अॅवोकाडो खावे.
सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लास संत्र्याचा रस प्यावा. तर रात्री झोपताना दुधाचे सेवन करावे. यामुळे शरीरात कॅल्शियम आणि विटामिन सी वाढण्यास मदत होते.