सध्या एलईडी, ओएलईडी आणि क्यूएलईडी टिव्हीची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या टिव्हींचा आकार आणि त्यांची डिझाईन ग्राहकांना नेहमीच आकर्षित करत असते. मात्र या टिव्हीची स्क्रीन अत्यंत नाजूक असते. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या वस्तूंचा वापर करून टिव्हीची स्क्रीन साफ केली तर स्क्रॅच किंवा डॅमेज सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
TV स्क्रीन साफ करताना सावधान! 'या' चुका पडू शकतात महागात, स्क्रीन साफ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

कधीही पेपर, टॉवेल किंवा टिशूचा वापर करून टिव्हीची स्क्रीन स्वच्छ करू नका, यामुळे स्क्रीनवर मायक्रो स्क्रॅच येऊ शकतात.

ग्लास क्लीनरचा वापर करून टिव्ही स्क्रीन स्वच्छ करत असाल तर थांबा. कारण टिव्हीची स्क्रीन आरश्यासारखी दिसत असली तरी देखील अत्यंत नाजूक असते.

अल्कोहोल बेस्ड क्लीनर किंवा रबिंग अल्कोहोलचा वापर केल्यास टिव्ही स्क्रीनवरील अँटी-ग्लेअर थर निघून जाऊ शकतो.

पाणी थेट टिव्हीच्या स्क्रीनवर शिंपडू नका. यामुळे पाण्याचे थेंब स्क्रीनच्या कोपऱ्यांत जाऊ शकतात. असे झाल्यास इलेक्ट्रॉनिक सर्किटला नुकसान पोहोचू शकतं.

नेल पॉलिश रिमुव्हर किंवा एसीटोन क्लीनर अतिशय स्ट्राँग असतात. त्यांचा वापर टिव्हीची स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी करू नका.

सर्वात आधी टिव्ही बंद करा. यानंतर एका मायक्रोफाईबर कपड्याच्या मदतीने हलक्या हाताने स्क्रीन स्वच्छ करा.






