भारतासह जगभरातील इतर सर्वच देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर मासे प्रेमी आहेत. महाराष्ट्राला 700 पेक्षा जास्त लांबीचा समुद्र किनाला लाभला आहे. मासे खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. माशांमध्ये असलेले पोषक घटक आणि प्रोटीन शरीरासाठी फायदेशीर ठरतात. पण आपल्यातील अनेकांना महाराष्ट्राचा राज्यमासा कोणते हे माहित नाही. चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)
हा आहे महाराष्ट्राचा राज्यमासा! जाणून घेऊया माशाबद्दल सविस्तर माहिती, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

महाराष्ट्राचा राज्यमासा 'सिल्व्हर पॉम्फ्रेट' आहे, ज्याला मराठीमध्ये पापलेट असे सुद्धा म्हंटले जाते. याशिवाय कोकणात काही ठिकाणी पापलेटला सारंगा या नावाने सुद्धा ओळखले जाते.

पापलेट माशाचे शास्त्रीय नाव पॅम्पस अर्जेंटियस असे आहे. २०२३ सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र सरकारने माशाच्या घटत्या संख्येमुळे आणि त्याच्या आर्थिक व सांस्कृतिक महत्त्वामुळे पापलेटला राज्य मासा म्हणून घोषित केले.

कोकण किनारपट्टीवर आणि संपूर्ण महाराष्ट्रात पापलेट खूप फेमस आहे. जेवणाच्या ताटात जर पापलेट असेल तर चार घास जास्त जातात आणि चव सुद्धा अतिशय सुंदर लागते.

कोकणातील आहारात मोठ्या प्रमाणावर माशांचे सेवन केले जाते. त्यात पापलेट मासा सुद्धा आवडीने खाल्ला जातो. चवीला अतिशय उत्कृष्ट, मऊ पोत आणि कमी काटे असलेला मासा सगळेच आवडीने खातात.

कोळी बांधवांसाठी उत्पन्नाचे मोठे साधन म्हणजे पापलेट मासा. वाढती मागणी आणि उच्च बाजारमूल्यामुळे मासेमारीमध्ये पापलेट मासा लॉटरी सामान मानला जातो.






