आतड्यांमध्ये झालेले घाणेरडे जंत नष्ट करण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन
जंत नष्ट करण्यासाठी कच्चा लसूण चावून खावा. यामध्ये अँटीपॅरासायटिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात. उपाशी पोटी कच्चा लसूण खाल्ल्यास पोटातील घाण बाहेर पडून जाईल.
भोपळ्याच्या बियांमध्ये क्युकरबिटिन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे पोटात झालेले जंत कमी होतात. भोपळ्याच्या बियांची पावडर करून मधात मिक्स करून खाल्ल्यास जंत कमी होतील.
कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. जंत झाल्यास एक कडुलिंबाचे पान चावून खाल्ल्यानंतर त्यावर कोमट किंवा गरम पाणी प्यावे.
खोबऱ्याच्या तेलात नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात. सकाळी उठल्यानंतर एक चमचा खोबऱ्याचे तेल प्यायल्यास आतड्यांमध्ये वाढलेले जंत नष्ट होतील आणि शरीर स्वच्छ होईल.
डाळिंबाचा रस केवळ रक्ताभिसरण सुधारण्यासाठी नाही तर शरीरातील घाण स्वच्छ करण्यासाठी सुद्धा प्रभावी ठरतो. सकाळी नियमित एक ग्लास डाळिंबाचा रस प्यावा.