मायग्रेनच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी नियमित करा 'या' फळाचे सेवन
तुतीमध्ये अधिक पाणी असते. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित या फळाचे सेवन करावे. तुती खाल्यामुळे शरीराचे वाढलेले तापमान नियंत्रणात राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात.
उन्हाळा वाढल्यानंतर आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. सतत डोकं दुखणे, चक्कर येणे, मायग्रेन इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुती खावी.
त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक लोक दैनंदिन आहारात तुतीचे सेवन करतात. यामुळे त्वचेवर आलेली काळी वर्तुळ आणि पिंपल्स निघून जाऊन त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसू लागते. तुती हे फळ त्वचा आणि केसांसाठी प्रभावी मानले जाते.
रोजच्या आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे लिव्हर स्वच्छ ठेवण्यासाठी आहारात तुतीचे सेवन करावे.
पोटात वाढलेली जळजळ, आम्लपित्त, बद्धकोष्ठता आणि गॅस इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुतीचे सेवन करावे. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.