उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे या दिवसांमध्ये शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळा वाढल्यानंतर शरीरात युरिक अॅसिड वाढू लागते. युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदना, मूत्रपिंडाचे आजार इत्यादी अनेक समस्या वाढून आरोग्याला आरोग्याला हानी पोहचू लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर दैनंदिन आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
गर्मीमुळे शरीरात वाढलेले Uric Acid कमी करण्यासाठी आहारात करा 'या' फळांचे सेवन
विटामिन सी युक्त संत्र्यामध्ये शरीराला आवश्यक असलेले सर्वच घटक आढळून येतात. त्यामुळे नियमित संत्र्याचे सेवन करावे. संत्र खाल्यामुळे युरिक ऍसिडची पातळी कमी होते.
किवीमध्ये विटामिन सी, फायबर आणि पोटॅशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. हे घटक शरीरात वाढलेली युरिक ऍसिडची पातळी कमी करतात.
लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं स्ट्रॉबेरी खायला सगळ्यांचं आवडते. यामध्ये असलेले घटक शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहेत. स्ट्रॉबेरीमध्ये असलेल्या विटामिन सी मुळे शरीरातील युरिक ऍसिडची पातळी नियंत्रणात राहते.
डॉक्टर नेहमीच सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंद खाल्यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. याशिवाय यामध्ये असलेले मॅलिक ऍसिड शरीरात वाढलेली युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात राहते.
चेरी खाल्यामुळे शरीरात वाढलेली युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये अँथोसायनिन्स नावाचे दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात.